संक्रांत समारोह



नमस्कार,

कार्यक्रमाची सवीस्तर माहिती आणि थोडक्यात रूपरेषा खाली देत आहोत. तसेच बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर (www.marathimandal-switzerland.com ) नावनोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी आणि आवर्जून कार्यक्रमाला यावे ही आग्रहाची विनंती.

दिनांक : २४ जानेवारी २०१६, रविवार.
वेळ : दुपारी ३ ते ६.
ठिकाण : Siedlungslokal - GBMZ
             Weidmannstrasse 14, 
             8046 Zürich.
शुल्क : सभासदांसाठी - १५ स्विस फ्रँक.
          इतर सर्वांसाठी - २० स्विस फ्रँक.
          वयोगट ५ ते ११ - ५ स्विस फ्रँक.
          वयोगट १ ते ४ - विनाशुल्क.
          
कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा:
१. उपस्थितांचे स्वागत आणि दिनदर्शिका वाटप.
२. हळदी-कुंकू समारंभ सोबत अर्थातच चहा / मसाला दुध आणि तिळगुळ.  
३. संक्रांत सणाबद्दल माहिती. (Video / Audio)
४. स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शन.
५. निरोप समारंभ आणि आगामी कार्यक्रमांबद्दल माहिती.
६. अल्पोपहार. [गुळाची पोळी-साजूक तूप, बटाटे वडे, चहा/कॉफी आणि जोडीला एखादा चटपटीत पदार्थ]

[विविध गुणदर्शनासाठी १ तासाचा मर्यादित कालावधी असेल. त्यामुळे सर्वप्रथम येणारी नावे गृहीत धरली जातील. इच्छुकांनी नावनोंदणी करतानाच तसा उल्लेख करावा. सोबत संपर्कासाठी ईमेलआयडी / फोन नंबर द्यावा.]

धन्यवाद.

बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड.





Comments