बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे १० एप्रिल २०१६ रोजी आपण चैत्र पाडवा साजरा करत आहोत. सवीस्तर माहिती खाली दिली आहेच. आपण सह कुटुंब सह परिवार आवश्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. कार्यक्रमाचे स्वरूप साधारण असे असेल : १. गुढी पूजन आणि दीप प्रज्वलन. २. नांदी. ३. निबंध स्पर्धा बक्षीस वितरण - हस्ते अतुल परचुरे. ४. अतुल परचुरे : एकपात्री प्रयोग (कालावधी १.४५ मिनिट. पहिल्या १ तासानंतर ३० मिनिटांचे मध्यंतर असेल).
पाडवा साजरा करताना आपण पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत गणपतीसाठी राखून ठेऊन यंदाच्या पाडव्याला एक नवीन प्रयोग करून बघणार आहोत. आपल्याच मराठी मित्र / मैत्रीणीना एक संधी देत आहोत त्यांचे पाक कौशल्य निमंत्रीतांसमोर प्रदर्शित करण्याची. तर कल्पना साधारण अशी आहे, ५ फूड स्टॉल असतील. २ इतर स्टॉल असतील. जसे हस्तकलेच्या वस्तू, पेंटिंग इत्यादी. स्टॉलचे शुल्क असेल २५ CHF फक्त. मर्यादित स्टॉल असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. अट एकच, पदार्थ महाराष्ट्रियन असावा. एका स्टॉल वर शक्यतो एकच पदार्थ असावा अशी अपेक्षा आहे. एक खाद्य पदार्थ आणि एखादा पेय प्रकार असे चालू शकते. पदार्थाची कीमत ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे स्टॉल धारकाचा असेल. परंतु कमाल किमत १० CHF इतकी असावी अशी अपेक्षा आहे. ठिकाण : GZ Affoltern, Bodenacker 25, 8046 Zurich. वेळ : दुपारी २ ते ५. इच्छुकांनी पुढील पत्त्यावर लवकरात लवकर संपर्क साधावा - bmmswitzerland@gmail.com धन्यवाद. बुहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड. |
Events 2016 >