Events 2016‎ > ‎

Ganesh 2016


Sorry ! As announced earlier, we have closed registration process

Now you can visit and take your tickets at event place

मस्कार मंडळी,

आधी जाहिर केल्याप्रमाणे दिनांक १० सप्टेंबर २०१६ रोजी आपण गणेशोत्सव साजरा करत आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा साधारण खालीलप्रमाणे असेल,
.
१. गणपतीची पूजा, स्थापना, आरती आणि स्तोत्र पठण : सकाळी १०.३० ते १२.३०. 
२. सहभोजन : दुपारी १२.३० ते २.
३. स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शन : दुपारी २ ते ३.३०.
४. चहापान : दुपारी ३.३० ते ४.
५. " मैफिल शब्द सुरांची" - राहुल रानडे, सुनील बर्वे : संध्याकाळी ४ ते ६.

"मैफिल शब्द सुरांची"  या कार्यक्रमाची सवीस्तर माहिती लवकरच फेसबुक पान आणि मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. 

.

.
कार्यक्रमाचे तिकीटदर खालील प्रमाणे असतील,
.
१. सभासदांसाठी : ४० CHF
२. इतर सर्वांसाठी : ५० CHF
३. वयवर्षे १ ते ४ : विनाशुल्क
४. वयवर्षे ५ ते १२ : १५ CHF

Paying/registering at event place will cost CHF 5 more. Make your payments online. 
.
कार्यक्रमाचे ठिकाण :
Gemeinschaftszentrum(GZ) Affoltern, Bodenacker 25, 8046 Zurich.
.

या कार्यक्रमासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची सोय मंडळाच्या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.  आजच आपला दिवस राखून ठेवा आणि बहुसंख्येने गणेशोत्सवात सहभागी व्हा अशी तुम्हा सर्वाना नम्र विनंती.
.

पैसे भरण्यासाठी खालील माहिती वापरा :
Bank Name : Kantonalbank St. Gallen
Beneficiary : Marathi Mandal Switzerland.
Account No.: 1955.3476.0502.
Bank Clearing No. 78119
IBAN : CH91 0078 1195 5347 6050 2.
SWIFT : SWIFT KBSGCH22.

Sorry ! As announced earlier, we have closed registration process

Now you can visit and take your tickets at event place


(Note : Please mention transaction ID while completing the registration.)
धन्यवाद.
.
बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड.


a Letter from Rahul Ranade


दिनांक २४ ऑगस्ट २०१६.
पुणे.
 
नमस्कार.
 
मी आणि तुमचा सगळ्यांचा आवडता कलाकार सुनील बर्वे स्वित्झर्लंडला येतोय – एक अनोखी मैफिल घेऊन - "मैफिल शब्द सुरांची".

या मैफिलीला मी ‘अनोखी’ या करता म्हणतो आहे, कारण एरवी मैफिलीत गाणारे गातात आणि श्रोते ऐकतात. या मैफिलीमधे श्रोते देखिल गाणार आहेत, बोलणार आहेत, गप्पा मारणार आहेत! तुमच्या सक्रीय सहभागानेच या मैफिलीत रंग चढत जाणार आहे.
 
माझं आणि सुनीलचं करियर साधारण एकत्रच चालू झालं. आम्ही अनेक प्रोजेक्ट्स मधे एकत्र होतो. साधारण बत्तीस वर्ष आम्ही दोघे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधे विविध भूमिका निभावतोय. गायक, नट, निर्माता, दिग्दर्शक म्हणून दोघेही वावरतोय. बत्तीस वर्षात आमच्या अनुभवांची पोटली चांगली जाड जूड झाली आहे. ही पोटली आम्ही तुमच्या समोर उघडणार आहोत.
 
या पोटली मधे कविता आहेत, गाणी आहेत, कहाण्या आहेत, किस्से आहेत... काही इतरांचे, तर काही आमचे स्वतःचे.
 
सुनीलचा नट ते ‘हर्बेरियम’चा निर्माता हा प्रवास विलक्षण आहे. प्रेरणादायी देखिल आहे. त्यातल्या काही टप्प्यांवर तो तुम्हाला निश्चित घेऊन जाईल. तो छान कविताही वाचतो, आणि सुरात गातोही! आपण नशीबवान असलो, तर तो त्याच्या चिरतारूण्याचं इंगित देखिल सांगेल!
 
माझ्या प्रत्येक गाण्यामागची गोष्ट रंजक आहे. त्यातल्या काही मला तुमच्या बरोबर शेअर करायला निश्चित आवडतील. पंडित भीमसेन जोशी, पु.ल.देशपांडे, आशा भोसले, या मी जवळून पाहिलेल्या माझ्या दैवतांविषयी नुसतंच बोलणार नाही, तर त्याचं अत्यंत दुर्मिळ ध्वनीमुद्रण देखिल ऐकवेन.
 
गाण्याचा जन्म कसा होतो, हे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल. आपण सगळे मिळून एका कवितेला चाल लावून बघुया. मला आवडेल तुमच्या बरोबर गाणं बनवायला. हा वेगळाच अनुभव तुम्हाला देखिल आवडेल याची खात्री आहे.
 
या मैफिलीची सांगता आपण सगळे मिळुन ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातल्या गाण्याने करूया. तुम्ही गायक असाल किंवा नसाल - सगळे प्रॅक्टिस करून या बरंका.

याचा काराओके ट्रॅक देखिल माझ्या वेबसाइटवर आहे. जरूर डाऊनलोड करून रियाज करा.
 
मूळ गाणं:
Hhttps://www.youtube.com/watch?v=5VVZp4r1VT4 
 
काराओके ट्रॅक:
http://rahulranade.com/Inner/Marathi_Films.html
 
भेटू १० सप्टेंबरला.

गणपतीबाप्पा मोरया!
 
राहुल रानडे.

Sorry ! As announced earlier, we have closed registration process

Now you can visit and take your tickets at event place


Comments